Malwani poem

एक मालवणी कविता !!
चिंचो, आवळे, काजू आणि गरे,
कोकणी माणूस लय लय बरे....
शिवीगाळये घालतत खरे,
मनांत त्यांच्या काय नाय बरे.....
करवंदा खावची तर कोकणात जावचा,
डोंगरातून फिरतांना, मजा लय गावता,
नदी किनारी झाडा बघानारळाची,
पाणी पिता तेतूरला, स्वर्गचगावता,
हिरवी हिरवी गार आंब्याची तोरा,काजीचो रंग बघा लाली लाल जरा,
जांभळाचो रंग जांभळो सगळ्यांकाठाऊक हा,
पण डायाबिटीसवाल्यांका मात्र लय लय भावता,
कापो आणि बरको, हे फणसाचेप्रकार,प्वॉटभर खाल्ल्यार वाढतापोटाचो आकार,
होडयेतून फिरतांना म्हणता,वल्हव रे नाखवा,
मुंबईचो चाकरमानी इलो, त्येका कोकण दाखवा....

Comments